Your Course Progress

Topics
0 / 0
0.00%
Practice Tests
0 / 0
0.00%
Tests
0 / 0
0.00%
Assignments
0 / 0
0.00%
Content
0 / 0
0.00%
% Completed

Admission

ध्यानासाठी योग्य वातावरण

ध्यानासाठी योग्य वातावरण (The Perfect Setup)

शांत जागा : शक्यतो जिथे आवाज कमी असेल अशी जागा निवडा. कोलाहलापासून दूर राहिल्याने मनाची एकाग्रता लवकर होते.

हवेचा प्रवाह: खोली बंदिस्त नसावी. खिडकी उघडी ठेवून शुद्ध हवा आणि नैसर्गिक प्रकाश येईल याची काळजी घ्या.

स्वच्छता आणि सुगंधी वातावरण: ध्यानाची जागा स्वच्छ असावी. तिथे भीमसेनी कपूर किंवा नैसर्गिक सुगंध असेल तर उत्तमच....

विशिष्ट आसन: जमिनीवर बसताना जाड सतरंजी किंवा योगा मॅट वापरा. पाठीचा कणा ताठ राहील अशा स्थितीत बसा. अनेकदा आपल्याकडे हे उपलबध नसेल तर स्वतःला आणि शरीराला शांत वाटेल , योग्य वाटेल तसे बसा, काही ध्यान किंवा संस्कार हे झोपूनही करता येतात, 

त्या बद्दल मी प्रत्येक वेळी सांगेल त्या पद्धतीने करावे . 

इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून दूर: ध्यानाला बसण्यापूर्वी मोबाईल सायलेंट करा किंवा दुसऱ्या खोलीत ठेवा.


ध्यानाचे फायदे (Benefits of Meditation)

मानसिक शांतता: रोजच्या धावपळीतून मिळणारा तणाव कमी होऊन मन शांत आणि प्रसन्न राहते.

एकाग्रता (Focus): कामावर किंवा अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते.

भावनिक संतुलन: राग, भीती आणि चिडचिड यांसारख्या भावनांवर नियंत्रण मिळवणे सोपे जाते.

शारीरिक आरोग्य: ध्यान केल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो आणि झोप चांगली लागते.

आत्मविश्वास: स्वतःच्या विचारांची स्पष्टता वाढल्यामुळे आत्मविश्वासात प्रचंड वाढ होते, जी एका वक्त्यासाठी खूप गरजेची आहे

 

Discussion