Your Course Progress

Topics
0 / 0
0.00%
Practice Tests
0 / 0
0.00%
Tests
0 / 0
0.00%
Assignments
0 / 0
0.00%
Content
0 / 0
0.00%
% Completed

Admission

वक्तृत्व शिकण्यासाठी ज्ञानाची शस्त्रे तयार करावी लागतात — त्यासाठी 5 Notebook System वापरायची आहे.

1️⃣

5 Notebook System

• वक्तृत्व शिकण्यासाठी ज्ञानाची शस्त्रे तयार करावी लागतात — त्यासाठी 5 Notebook System वापरायची आहे.

• यशोगाथा वही – या वहीत तुमचा वक्ता बनण्याचा प्रवास सुरू होतो. पहिल्या पानावर सही करून तुमच्या भविष्याच्या ऑटोग्राफची सुरुवात करायची.

• खजिना वही – सुंदर वाक्ये, उदाहरणे, कथा, सुविचार यांचा संग्रह. हा तुमच्या भाषणाचा कच्चा माल आहे.

• स्क्रिप्ट वही – तुमच्या भाषणाच्या सर्व स्क्रिप्ट येथे लिहिल्या जातील. पहिल्या पानावर “माझी पहिली स्क्रिप्ट” लिहून स्वतःची माहिती लिहायची.

• कार्यक्रम वही – जिथे जिथे बोलाल तिथले अनुभव, प्रेक्षकांची प्रतिक्रिया आणि स्वतःची सुधारणा यात लिहायची.

• पॉकेट डायरी – अचानक सुचलेले विचार, वाक्ये, निरीक्षणे लगेच लिहिण्यासाठी. नंतर ते खजिना वहीत टाकायचे.

या पाचही वह्या तुमच्या वक्तृत्व प्रवासातील सर्वात मोठी साधने असतील.

Power Line:
“ज्याच्या वहीत विचारांचा खजिना असतो, त्याच्या शब्दांतच शक्ती निर्माण होते.”

Discussion