वक्ता होण्यासाठी प्रचंड वाचन, भारी आवाज किंवा मोठं शिक्षण लागतं — हा सर्वात मोठा गैरसमज आहे.”
वक्ता होण्यासाठी प्रचंड वाचन, भारी आवाज किंवा मोठं शिक्षण लागतं — हा सर्वात मोठा गैरसमज आहे.”
• वाचन केल्यानेच वक्ता होता येतो हा गैरसमज — लाखो लोक वाचन करतात, पण सगळे वक्ते होत नाहीत.
• मोठ्या वक्त्यांची भाषणं ऐकली तरच वक्ता होता येतो हा गैरसमज — लाखोंची गर्दी भाषणं ऐकते, पण त्यातून फार कमी लोक वक्ते बनतात.
• प्रेरणा लागते हा गैरसमज — प्रेरणा तात्पुरती असते; पण रोजचा सराव आणि शिस्त वक्ता घडवते.
• मोठा, भारी आवाज लागतो हा गैरसमज — आवाज मोठा नसला तरी चालतो; तो स्पष्ट आणि विश्वासू असला पाहिजे.
• खूप शुद्ध भाषा लागते हा गैरसमज — आईची भाषा हीच सर्वात शुद्ध भाषा आहे. मनातून आलेले शब्द प्रभाव निर्माण करतात.
• जास्त शिकलेल्यांनाच वक्तृत्व जमतं हा गैरसमज — व्यवहार समजणं जास्त महत्त्वाचं आहे. शिक्षण एकमेव मापदंड नाही.
• जन्मजात टॅलेंट लागते हा गैरसमज — माणूस जन्माला येतो, पण वक्ता घडवावा लागतो. सराव आणि योग्य मार्गदर्शन महत्वाचे.
• वय झाल्यावर शिकता येत नाही हा गैरसमज — शिकण्याला वय नसतं; फक्त इच्छा आणि तयारी लागते.
“वक्ता सराव, शिस्त आणि धाडसाने घडवला जातो.”