कृती
कृती : स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचे ऑडिट करा !
आरशासमोर उभे राहून स्वतःचे निरीक्षण करा.
केस, चेहरा, दात, नखे, कपडे आणि पादत्राणे यांची स्वच्छता व नीटनेटकेपणा तपासा.
त्यात नैसर्गिक स्मितहास्य, चालणे, उभे राहणे आणि बोलताना चेहऱ्यावरील भाव यांचे निरीक्षण करा.
स्वतःला तीन प्रश्न विचारा.
• माझ्या व्यक्तिमत्त्वातील सर्वांत चांगली गोष्ट कोणती?
• माझ्या सादरीकरणात कोणती एक गोष्ट सुधारण्याची गरज आहे?
• ही सुधारणा करण्यासाठी मी आज कोणती कृती करणार आहे?
स्वतःच्या सादरीकरणात सुधारणा करण्यासाठी एक गोष्ट निवडा आणि ती प्रत्यक्ष करून पाहा.
उदाहरणार्थ, कपड्यांची योग्य निवड, केसांची नीट मांडणी,
ताठ पण सहज शरीरस्थिती किंवा चेहऱ्यावर नैसर्गिक स्मित.
लक्षात ठेवा :
ग्रूमिंगचा उद्देश दुसऱ्यासारखे दिसणे नाही; तर स्वतःचे स्वच्छ, नीटनेटके,
आत्मविश्वासपूर्ण आणि प्रसंगाला अनुरूप व्यक्तिमत्त्व घडवणे हा आहे.