Back to Course Overview
नैसर्गिक वक्तृत्व

हुकची शक्ती


लेव्हल ७ : प्रभावी प्रारंभ (The Power Opening)

पायरी १ : Hook ची शक्ती (The First 10 Seconds)

१. सारांश - मुख्य सराव मुद्दे (व्हिडिओ न पाहताही समजेल असे)

'Hook' (हुक) म्हणजे अशी गोष्ट जी श्रोत्यांच्या मनाला पहिल्या १० सेकंदात आपल्याकडे खेचून घेते. जसा मासे पकडण्यासाठी गळ टाकावा लागतो, तसंच भाषणाच्या सुरुवातीला श्रोत्यांच्या विचारांना खिळवून ठेवण्यासाठी 'हुक' वापरावा लागतो. हे पहिले वाक्य 'मिरची'सारखे तिखट किंवा 'मधा'सारखे गोड असावे, जे श्रोत्यांच्या मनाला थेट टोचेल किंवा गोड वाटेल. भाषणाच्या सुरुवातीला "माझे नाव अमूक आहे" असे न म्हणता थेट हुकने सुरुवात करा.

२. टेक्स्ट आणि पीडीएफ कंटेंट्स (कॉपी करण्यासाठी)

१. प्रश्नाचा हुक (Question Hook): "इथे उपस्थित असलेल्यांपैकी किती लोकांना असं वाटतं की, आपल्याकडे प्रचंड ज्ञान असूनही फक्त स्टेजवर गेल्यावर आपण ते मांडू शकत नाही?"

२. कौटुंबिक हुक: "आपल्यातील किती लोक बायकोला घाबरतात?" (विनोदी सुरुवात)

३. जिज्ञासा हुक: "तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही हे कधी ऐकले आहे का?" अशा प्रकारे प्रश्नाने सुरुवात केल्यास लोक विचारात पडतात.

४. धक्कादायक हुक (Shocking Fact): "एका जागतिक सर्वेक्षणानुसार, माणसाला मृत्यूच्या भीतीपेक्षा जास्त भीती 'स्टेजवर उभं राहून बोलण्याची' वाटते!"

५. ऐतिहासिक धक्का: "ज्या इंग्रजांचा सूर्य कधीही मावळला नाही, ते इंग्रज ज्या राजासमोर झुकले! आज त्या राजाची जीवनगाथा आपण पाहणार आहोत."

६. रहस्यमयी हुक: "ज्या व्यक्तीमुळे संभाजी महाराज मोगलांच्या तावडीत सापडले, आज त्या व्यक्तीची सत्य माहिती आपण घेणार आहोत."

७. कथा किंवा प्रसंगाचा हुक (Story Hook): "आत्ता मी इकडे येत होतो, तेव्हा मला एक माणूस भेटला..." किंवा "काल रात्री मला एक अद्भुत स्वप्न पडले."

८. वर्णनात्मक सुरुवात: "रात्रीची वेळ होती, रातकिड्यांची किरकिर सुरू झाली होती आणि राधा घराच्या बाहेर पडली..."

९. खजिन्याचा हुक: "तुम्हाला माहिती आहे का? एका गावात तब्बल १०० कोटींचा खजिना सापडला आहे!"

१०. हुक शोधण्याची पद्धत: माहितीचे संकलन करा, त्यातील रोमांचक भाग शोधा आणि त्याला प्रश्नार्थक किंवा धक्कादायक रूप द्या.

३. टास्क - गृहपाठ

टास्क १: 'मोबाईलचे व्यसन' या विषयावर एक 'प्रश्नाचा हुक' तयार करा.

टास्क २: 'छत्रपती शिवाजी महाराज' या विषयावर एक 'धक्कादायक हुक' लिहून काढा.

टास्क ३: "मी इकडे येत असताना..." या वाक्याने सुरू होणारी ३ ओळींची छोटी गोष्ट तयार करा.

टास्क ४: आरशासमोर उभे राहून, नाव न सांगता थेट हुकने भाषणाची सुरुवात करण्याचा ५ वेळा सराव करा.

टास्क ५: तुमच्या आवडीच्या विषयावर 'तुम्हाला माहिती आहे का?' या प्रश्नाने सुरू होणारा एक हुक तयार करा.

४. पुराव्याचे संकलन

१. टास्क १ मध्ये तयार केलेल्या प्रश्नाचा फोटो किंवा मजकूर पाठवा.

२. टास्क २ मधील ऐतिहासिक हुकचा ऑडिओ मेसेज रेकॉर्ड करून पाठवा.

३. थेट हुकने सुरुवात करतानाचा १५ सेकंदाचा व्हिडिओ अपलोड करा.

४. तुमच्या डायरीतील 'हुक शोधण्याच्या पद्धती'चा फोटो शेअर करा.

 

Discussion