Back to Course Overview
नैसर्गिक वक्तृत्व

प्रभावी शेवट

पायरी ५ : प्रभावी शेवट (The Powerful Climax)

Hook:

"तुम्ही उत्तम चित्रपट पाहिला, पण त्याचा शेवट अचानक आणि अपूर्ण झाला तर तुम्हाला कसे वाटेल? अधुरे... भाषणाचेही तसेच आहे. सुरुवात आणि मध्य कितीही चांगला असला, तरी शेवट जर 'ठसकेबाज' नसेल, तर श्रोते रिकाम्या हाताने घरी जातात!"

सारांश (Summary):

मानवी मेंदूची एक खास सवय आहे - तो कोणत्याही गोष्टीची 'पहिली' आणि 'शेवटची' बाब सर्वात जास्त लक्षात ठेवतो. अनेक वक्ते भाषणाच्या शेवटी "बस एवढंच... धन्यवाद" असे म्हणून भाषण संपवतात, ज्याला 'कमकुवत शेवट' म्हणतात. प्रभावी शेवट म्हणजे श्रोत्यांच्या मनात विचार, प्रेरणा किंवा कृतीची ठिणगी निर्माण करणे.

प्रभावी शेवटाचे ५ 'DSD' प्रकार:

१. प्रेरणादायी संदेश: लोकांना काहीतरी सकारात्मक करण्याची ऊर्जा द्या.

२. विचार करायला लावणारा प्रश्न: श्रोत्यांना स्वतःच्या आयुष्याबद्दल अंतर्मुख करा.

३. घोषवाक्य (Slogan): एक असे वाक्य जे लोक जाताना गुणगुणत जातील.

४. छोटी हृदयस्पर्शी कथा: संपूर्ण भाषणाचा सार सांगणारी एक शेवटची गोष्ट.

५. कृतीचे आवाहन (Call to Action): श्रोत्यांना आता नक्की काय करायचे आहे, हे स्पष्ट सांगा.

DSD महत्त्वाचा नियम:

भाषणाचा शेवट कधीही अचानक करू नका. श्रोत्यांना मानसिकरीत्या तयार करण्यासाठी खालीलपैकी एका वाक्याने सुरुवात करा:

"आता शेवटी एकच गोष्ट सांगतो..."
"या भाषणाचा शेवट करताना मला इतकेच म्हणायचे आहे..."
"जाता जाता एक विचार देऊन जातो..."


काय करावे / कसे करावे:

१. शेवटचा भाग उत्साहात आणि चढत्या आवाजात (High Pitch) असावा.

२. शेवटचे वाक्य बोलल्यानंतर २ सेकंद शांत उभे राहा (Pause) आणि मगच स्टेज सोडा.

३. तुमचे शेवटचे वाक्य हे तुमच्या भाषणाच्या मुख्य विषयाशी संबंधित असावे.

TASK:

तुमच्या आवडीच्या विषयावर एक 'प्रेरणादायी घोषवाक्य' किंवा 'कृतीचे आवाहन' देणारे शेवटचे वाक्य तयार करा आणि ते आरशासमोर जोरात म्हणून पहा.

PURAVA:

तुम्ही तयार केलेले भाषणाचे शेवटचे 'जबरदस्त वाक्य' मेसेज करून पाठवा.

 

Discussion