आवाजाच्या भावना
आवाज आणि सादरीकरण
पायरी १ : आवाजाच्या भावना (Emotions in Voice)
Hook:
"सह्याद्री वाहिनीवरच्या ७ च्या बातम्या आठवतात का? 'नमस्कार, आजच्या ठळक बातम्या...' आणि आताच्या खाजगी चॅनेलवरच्या बातम्या - 'ब्रेकिंग न्यूज! मोठा भूकंप!'. दोन्ही बातम्याच देतात, पण पद्धत बदलली की प्रभाव बदलतो. तुमच्या आवाजात भावना नसतील, तर तुमचे शब्द फक्त 'ध्वनी' आहेत, 'संदेश' नाहीत!"
सारांश (Summary):
आवाज हा फक्त हवेचा कंप पावणारा प्रवाह नाही, तर ती एक ऊर्जा आहे. भाषणात दोन गोष्टी असतात: १. शब्द (Words) आणि २. आवाज (Voice). प्रत्येक शब्दाला स्वतःची एक भावना असते. जर तुम्ही 'रागाचा' शब्द 'प्रेमाने' बोललात किंवा 'प्रेमाचा' शब्द 'रागाने' बोललात, तर अर्थाचा अनर्थ होतो. आवाजात योग्य भावना ओतल्या की साधे शब्दही काळजाला भिडतात.
३ जबरदस्त उदाहरणे (The DSD Style):
१. शब्दांची कट्टरता: 'खबरदार!' हा शब्द उत्साहात किंवा लाडात म्हणून चालणार नाही, तो आवेगातच हवा. 'बाळा, कुठे लागलं तर नाही ना?' हे केवळ वात्सल्याच्या सुरातच शोभते.
२. एकच शब्द, अनेक भावना: 'शहाणा' हा शब्द आईने मुलाला म्हटला तर ते 'कौतुक' असते, बापाने मुलाला रागावून म्हटलं तर तो 'धमकावणी' असते आणि भांडणात कुणी म्हटलं तर तो 'टोमणा' असतो. वक्ता म्हणून तुम्हाला हे छटा (Shades) समजल्या पाहिजेत.
३. ध्वनी vs भावना: अॅम्ब्युलन्सचा सायरन हा फक्त 'ध्वनी' आहे, त्यात भावना नाहीत म्हणून आपण तो ऐकून अस्वस्थ होतो. पण त्याच भोंग्यावर लागलेले गाणे आपण तासनतास ऐकतो कारण त्यात 'भावना' आहेत.
काय करावे / कसे करावे:
१. शब्दांचा भाव ओळखा: बोलण्यापूर्वी तो शब्द कोणत्या भावनेचा (प्रेम, राग, उत्साह, दुःख) आहे ते ओळखा.
२. ऊर्जा (Energy): तुमच्या आवाजात उत्साह ठेवा. जेव्हा आवाजात ऊर्जा असते, तेव्हा श्रोत्यांचे लक्ष विचलित होत नाही.
३. नैसर्गिक राहा: कोणाचीही नक्कल करू नका, पण आपल्या आवाजातील चढ-उतार (Modulation) विकसित करा.
TASK:
'मूर्ख' हा एकच शब्द खालील ३ भावनांमध्ये आरशासमोर म्हणून पहा:
१. मित्राला थट्टेने.
२. लहान मुलाला मायेने.
३. कोणावर तरी प्रचंड रागावून.
PURAVA:
हा सराव करताना तुम्हाला कोणत्या भावनेत शब्द बोलणे सर्वात कठीण गेले, ते मेसेज करा.